औरंगाबाद : शहरामध्ये लस साठवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर सेंटर उभारण्यात आले असून यात तीन लाख लस साठवून ठेवण्याची क्षमता असल्याची माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. याची विशेष काळजी घेतली जात असून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लस पाठवल्या तरीही औरंगाबाद महानगरपालिका या लस साठविण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद महापालिकेकडे तीन लाख लस साठवण्याची क्षमता, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती - डॉ. नीता पाडळकर
औरंगाबादमध्ये लस साठवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर सेंटर उभारण्यात आले असून यात तीन लाख लस साठवून ठेवण्याची क्षमता असल्याची माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
लस साठविण्यासाठी विशेष यंत्रणा
जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण हाच प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकार युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवित आहे. यासाठी लस पुरवठ्यानंतर लस साठविणाच्या केंद्रांवरही लस वाया जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. औरंगाबाद शहरात लसीकरण स्टोअर रूममध्ये तीन लाख लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. शहरातील बन्सीलाल नगर या भागात असलेल्या आरोग्य केंद्रात मुख्य स्टोअर रूम आहे, तर सिडको भागातही केंद्र उभारण्यात आले आहे. या स्टोअर रूमची विशेष काळजी घेतली जाते. स्टोअर रूममध्ये येणाऱ्या अडचणींसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचेही पाडळकर यांनी सांगितले.
हेही वाचा -मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती, सुदैवाने जीवितहानी नाही