महाराष्ट्र

maharashtra

नव्या आयुक्तांचे स्वागत करायला गेले, अन् पाच हजारांचा दंड भरून आले!

By

Published : Dec 9, 2019, 7:08 PM IST

औरंगाबादच्या नव्या आयुक्तांचे स्वागत करणे पालिका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. प्लास्टिकचा वापर केल्यामुळे पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यालाच पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

Aurangabad Municipal Commissioner takes action against officers
प्लास्टिक वापरल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर कारवाई

औरंगाबाद -महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी पदभार स्वीकारला. मात्र पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या शिस्तीचा नमुनाही दाखवून दिला आहे. प्लास्टिक कॅरीबॅग असलेला पुष्पगुच्छ दिल्याने आयुक्त पांडेय यांनी पालिका अधिकारी रामचंद्र महाजन यांना पाच हजारांचा दंड भरायला लावला आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेच्या कामात चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका मिळणार, असे संकेत मिळत आहे.

प्लास्टिक वापरल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा... अमित शाह यांच्याकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधामध्ये 82 मते

महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी पदभार स्वीकारताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालिकेतील अधिकारी व कर्मचारी आले होते. नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी नव्या आयुक्तांना पुष्पगुच्छ दिला. मात्र त्यांना हे शुभेच्छा देणे चांगलेच महागात पडले आहे. प्लास्टिक कॅरीबॅग असलेला पुष्पगुच्छ दिल्याने आयुक्तांनी अधिकारी महाजन यांना पाच हजारांचा दंड लावला.

हेही वाचा... हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी SIT गठीत, टीमचं नेतृत्व 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले. सोमवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली, तरी औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. औरंगाबाद महानगर पालिका आयुक्तपदी आस्तिक कुमार पांडेय यांनी नव्याने पदभार घेतला आहे. त्यांची कार्यशैली पाहता याआधी त्यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यावर धडक करवाईचे कौतुक केले गेले.

हेही वाचा... श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज राहायचे भाड्याच्या घरात, म्हणाले इतिहासाशी छेडछाड नको

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदभार घेण्याआधी त्यांच्या अशा कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुधारणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पालिकेचे आयुक्त म्हणून रुजू होताच आस्तिक कुमार पांडेय यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दंड लावून, आपले मनसुबे जाहीर केले आहेत. पालिकेत प्लास्टिक बंदी बाबत सक्ती करणारे नव आयुक्त आता शहराला अशीच शिस्त लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details