महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Labour colony : लेबर कॉलनीतील तीनशेहून अधिक घरांवर बुलडोझर; रहिवासीयांना अश्रू अनावर - औरंगाबाद लेबर कॉलनीवर प्रशासनाची कारवाई

शहरवासियांसाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या लेबर कॉलनीमधील ( Aurangabad Labour Colony ) जीर्ण झालेल्या इमारतींवर न्यायालयाच्या आदेशाने बुलडोझर चालवण्यात आले.

Aurangabad Labour colony
Aurangabad Labour colony

By

Published : May 11, 2022, 3:32 PM IST

औरंगाबाद -शहरवासियांसाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या लेबर कॉलनीमधील ( Aurangabad Labour Colony ) जीर्ण झालेल्या इमारतींवर न्यायालयाच्या आदेशाने बुलडोझर चालवण्यात आले. जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जवळपास तीनशेहून अधिक घरांवर बुलडोझर फिरवले ( District Administration Demolished 300 Houses ) आहे. ही कारवाई सुरू असताना तिथे राहत असलेल्या नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. शासनाने कारवाई करताना माणुसकी दाखवली का नाही, राज्यात इतर ठिकाणी लेबर कॉलनीबाबत सहानुभूतीने विचार करण्यात आला. मात्र, इथे का नाही?, असा प्रश्न उपस्थित करत घराची माती उचलल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली.

यावेळी येथील ज्योती पुजारी यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "वडील कमिश्नर ऑफीसमध्ये असल्याने आमचे बालपण याच लेबल कॉलनीत गेलो. या लेबर कॉलनीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत होते. यामुळे प्रत्येकाच्या सणांमध्ये आम्ही सहभागी होत होतो. गेल्या पन्नास वर्षापासून या सोसायटीतील नागरिकांशी आमची नाळ जोडली गेली होती. आता आई-वडील राहिले नाहीत. मात्र, सोसायटी सोडणार असल्यामुळे मी इथे आले. आलिशान घरांमध्ये मिळणार नाही, ते निस्वार्थी प्रेम या सोसायटीतील नागरिकांनी आम्हाला दिले," असेही ज्योती पुजारी यांनी सांगितले.

लेबर कॉलनीमधून आढावा घेताना प्रतिनिधी

'वडिलांना नागरिकांनी लेकरासरख घरी आणलं' - पुढे त्यांनी म्हटले की, 'आख्खं बालपण यास लेबर कॉलनीतील नागरिकांसोबत घालवल्याने बालपणातील प्रत्येक आठवण या कॉलनीतील गल्लीबोळात आहे. वडील मुंबईला कामानिमित्त जात असत. एक वेळेस त्यांना घरी येताना मार लागला. यावेळी परिसरातील नागरिकांनी अक्षरशः त्यांना लहान लेकराप्रमाणे घरी आणून सोडले होते.'

'मध्यमवर्गीय कुटुंब इथे खूप आनंदाने जगलो' -'लेबर कॉलनी परिसरामध्ये प्रत्येक जाती धर्माचे नागरिक राहत होते. प्रत्येक नागरिक दुसर्‍याच्या सुख-दुःखात उत्सवामध्ये सहभागी होत होता. त्यासोबतच मध्यमवर्गीय कुटुंब या ठिकाणी खूप आनंदाने जगलो,' असेही ज्योती पुजारी यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा -राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल - बाळा नांदगावकर

ABOUT THE AUTHOR

...view details