औरंगाबाद - कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार राज्यभरात सातत्याने उघड होतो आहे. औरंगाबादेतही रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आला असून यात घाटी रुग्णालयातील परिचरिकेच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यानंतर परिचारिका फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने एका चालकासह औषधी विक्री प्रतिनिधी (एमआर) अशा दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
परिचारिका झाली फरार
या प्रकरणी घाटीतील परिचारिकेने घोटाळा करून पतीकडे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी इंजेक्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून आरती नितीन जाधव यांना आरोपी करण्यात आले. गुन्हा दाखल होताच आरती मात्र फरार झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला हॉटेल विटस, हॉटेल बिटस् ते पीरबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण अवैधरित्या रेमडेसिवीर इंजेक्शन प्रति २५ हजार रुपये याप्रमाणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून औषधी निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोज शिंदे यांनी सापळा लावला असता, दोघेजण कारने (एमएच २० ईवाय ८७३४)मध्ये आल्याचे दिसताच त्यांना बेड्या होत्या.