कांदा निर्यात बंदी उठवा, खासदार दानवेंच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन - औरंगाबाद दानवेंच्या ऑफिससमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्र सराकराने 14 सप्टेंबरला अचानक कांद्यावरील निर्यातबंदी लावून स्वतः कायदेभंग केलाय, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे. गेले सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर मिळत आहे. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. कांदा निर्यातमुळे शेतकऱ्यांना कुठेतरी चांगले भाव मिळत असताना, अचानक कांद्यावर निर्यातबंदी लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

खासदार दानवेंच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
औरंगाबाद -शेतकऱ्यांना बाजारपेठ खुल्या करून देणाऱ्या सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी का उठवली नाही, असा प्रश्न शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला. खासदारांनी संसदेत प्रश्न उपस्थित करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
कांदा निर्यात बंदी उठवा, खासदार दानवेंच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
Last Updated : Sep 23, 2020, 5:32 PM IST