औरंगाबाद - आर्थिक उत्पन्न कमी दाखवून पत्नी आणि मुलीचे संगोपन करण्याची जबाबदारी झटकणाऱ्या पतीला कौटुंबिक न्यायालयाने ( Aurangabad Family court ) दणका दिला आहे. न्यायाधीश आशिष आयचीत यांनी पत्नीसह मुलीसाठी मासिक पोटगी देण्याचे ( alimony for wife and daughter ) आदेश दिले आहेत. त्याबरोबरच पत्नीने केलेल्या दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
अजय सोनवणे यांचे शहरातील हनुमान नगर या परिसरात गुरुकृपा ज्वेलर्स ( Gurukrupa Jewelers owner case ) नावाचे दुकान आहे. त्यांची पत्नी पूजा ही बाळंतपणासाठी माहेरी गेली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर ती परत आलीच नाही. पुन्हा संसार सुरू करण्यासाठी त्याने कुटुंब कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. तर त्याची पत्नी पुजा हिने कौटुंबिक न्यायालयात पोटगीचा दावा ( plea for alimony in court ) दाखल केला होता. या दोघांचे लग्न 16 मे 2015 रोजी झाले होते. तर 12 सप्टेंबर 2016 मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र, एकमेकांशी पटत नसल्याने दोघांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केल्या होत्या.
हेही वाचा-Dr. Suvarna Vaze Murder Case : पतीनेच हत्या केल्यानंतर जाळला मृतदेह; संदीप वाजेला सात दिवसांची पाेलीस काेठडी
न्यायालयात पतीने सांगितले कमी उत्पन्न
मुलीच्या जन्मापासून पतीने मुलगी आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी कुठलीही आर्थिक मदत केली नसल्याचे पूजा यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. कमी असल्याचे सांगत पतीने पोटगी दिली नसल्याचे न्यायालयात सांगितले. मुलीच्या जन्मापासून पत्नी आणि मुलगी माहेरी आहे. दागिन्यांचा व्यवसाय असल्याने पतीचे उत्पन्न चांगले असल्याचे पूजा यांच्या वकिलांनी सांगितले. पतीने जाणीवपूर्वक कमी उत्पन्न असल्याचे दाखविल्याचा वकिलांनी आरोप केला. अजयने पूजाला नांदण्यासाठी दावा केला. त्यात हेतू प्रामाणिक नसल्याचा आक्षेप वकिलांनी नोंदविला.