मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलत आहोत, याबाबत चव्हाण यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वाढविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते. सोबतच झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.