महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Crime : 'पोलिसांचे सुरक्षा कवच' भेदत चोरांनी पळविले दागिने - पोलिस

चोर पकडण्यासाठी पोलीस ( Police ) नवनव्या कल्पना राबवतात. तशी काहीशी कल्पना पंढरपूर ( Pandharpur ) यात्रेच्या निमित्ताने राबवली. गर्दीचा फायदा घेत चोर सर्वसामान्यांचे पाकिट, मंगळसूत्र, चेन चोरी करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लावली.

Aurangabad Crime
Aurangabad Crime

By

Published : Jul 12, 2022, 2:34 PM IST

औरंगाबाद -एकादशीच्या ( Ekadashi ) निमित्ताने हजारो भाविक वाळूज जळवळील प्रती पंढरपूर ( Pandharpur ) येथे दरवर्षी येत असतात. मात्र, त्यावेळी पाकिटमारी मंगळसूत्र चोरी ( Incident of theft ) अशा घटना घडतात. मात्र, त्यावर उपाय योजना करत पोलिसांनी ( Police ) वारकरी वेषात गस्त घातली, आणि गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या 35 जणांना अटक ( Thief arrested ) करण्यात आली. इतकंच नाही तर, रविवारी दिवसभरात गुन्हा घडल्याबाबत एकही तक्रार नसल्याच पोलिसांनी सांगितलं होत. मात्र, 4 महिलांचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारी प्राप्त झाले आहेत.

पोलीस झाले वारकरी -चोर पकडण्यासाठी पोलीस ( Police ) नवनव्या कल्पना राबवतात. तशी काहीशी कल्पना पंढरपूर ( Pandharpur ) यात्रेच्या निमित्ताने राबवली. गर्दीचा फायदा घेत चोर सर्वसामान्यांचे पाकिट, मंगळसूत्र, चेन चोरी करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लावली. साध्या वेशात पोलीस असतातच मात्र यावेळी वारकऱ्यांच्या वेषात पोलीस तैनात करण्यात आले. 6 पोलीस अधिकारी आणि 60 कर्मचारी तैनात करण्यात आले. दिवसभरात वारकऱ्यांच्या वेषात असलेल्या पोलिसांनी तब्बल 36 चोरांना पकडत नागरिकांच्या संपत्तीचे संरक्षण केले आहे.

तरीही 4 महिलांचे दागिने चोरीला -यात्रे दरम्यान चोरी होऊ नये, यासाठी पोलिसांनी चूक बंदोबस्त लावला होता. 700 पोलीस यासाठी तैनात करण्यात आले होते. वारकऱ्यांच्या वेशभूषेत गुन्हे शाखेचे कर्मचारी ग्रस्त घालत होते. इतकंच नाही तर 47 सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती. अस असलं तरी या सुरक्षा यंत्रणेतही 4 महिलांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याचं उघड झाल आहे. संगीता रमेश पाटील यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, सोनाली शंकर पवार यांच्या गळ्यातील 2 ग्रॅमचे मंगळसूत्र, सोनाली ललित पाटील यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र, तर सुषमा गादेकर यांच्या मुलीच्या गळ्यातील अर्धा ग्रॅम सोन्याचा ओम चोरांनी लांबविला आहे, अशा तक्रारी सोमवारी दिवसभरात प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे चोरांनी पोलिसांचे सुरक्षा कवच भेदल्याचं पाहायला मिळालं.

पोलिसांनी केली जनजागृती -आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर भागात दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे चोरांपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली. जवळपास 28 ठिकाणी वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून चोरांपासून सावध राहण्याचे आणि अडचण असल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले. तर येणाऱ्या पालख्यांमध्ये तैनात अधिकारी आणि कर्मचारी यांनी पावली खेळत टाळ मृदंग वाजवत सहभाग घेतला. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केले, असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा -Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

ABOUT THE AUTHOR

...view details