औरंगाबाद : औरंगाबादचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली (Aurangabad Collector Sunil Chavan replaced) झाली. त्यांच्या जागी मनपाचे माजी आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली (Aurangabad new Collector Astik Kumar Pandey) आहे. सुनील चव्हाण यांची मुंबई विकास आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
Aurangabad Collector Transfer : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली, आस्तिक कुमार पांडेय नवे जिल्हाधिकारी - औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली (Aurangabad Collector Sunil Chavan replaced) झाली. त्यांच्या जागी मनपाचे माजी आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली (Aurangabad new Collector Astik Kumar Pandey) आहे.
कोरोनाकाळात जिल्हाधिकारी चव्हाण चर्चेत -कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची महावितरणच्या सहसंचालक पदावरून जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. सुनील चव्हाण यांनी घेतलेले निर्णय देशभर गाजले. वेगवेगळे केलेले प्रयोग राज्य पातळीवर राबविण्यात निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे चव्हाण यांची कारकीर्द चांगलेच चर्चेत राहिली होती. 'नो वॅक्सिन-नो पेट्रोल', नो वॉक्सिन-नी रेशन' असे अनेक उपक्रम राबवत लसीकरण वाढवण्याचा आणि कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केलेल्या त्यांचा प्रयत्न विशेष ठरला. तर लेबर कॉलनी येथील निवासस्थान रिकामे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यामुळे शासनाला हजारो कोटींची जागा ताब्यात मिळाली. या निर्णयाची देखील सर्वत्र चर्चा (Aurangabad Collector Sunil Chavan) झाली.
पांडेय नवे जिल्हाधिकारी -मनपा प्रशासक तथा आयुक्त असलेले आस्तिक कुमार पांडेय यांच्या कार्यकाळात अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले. यामध्ये स्मार्ट सिटी निधीतून लाखो रुपयांची खरेदी, खामनदी उद्यानाला राजकीय नेत्यांची नावे देण्यात आली, त्यावरून त्यांना विरोध झाला. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात सायकल ट्रॅक आला. महानगरपालिकेत अनेक वेळा कामांना गती न दिल्याचा आरोप झाला. कोरोना काळात अनावश्यक गोष्टींची खरेदी, असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जवळ असलेले अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मनपा आयुक्त पदाहून बदली झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी जिल्हाधिकारी म्हणून ते आता कार्यकाळ सांभाळणार आहेत. शुक्रवारी ते आपला पदभार स्वीकारतील, अशी माहिती समोर आली आहे. तर ग्रामीण भागाचा विकासाला प्राधान्य देणार असल्याचे आस्तिक कुमार पांडे यांनी (Aurangabad Collector Transfer) सांगितलं.