महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दारूची अवैधरित्या विक्री करणारी दुकाने सील करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना - aurangabad liquor news

नियमाचे पालन होत नसल्याने दारूची दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

aurangabad Collector suni chavan
aurangabad Collector suni chavan

By

Published : Mar 23, 2021, 7:08 PM IST

Updated : Mar 23, 2021, 8:03 PM IST

औरंगाबाद - वाळूज परिसरातील अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानांची जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. यावेळी नियमाचे पालन होत नसल्याने दारूची दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

धडक भेट

औरंगाबादच्या वाळूज परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांच्या दुकानांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धडक भेट देऊन दुकान सील करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनाच्या कार्यकाळात नियमावली डावलून दुकानांतून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना मिळली. दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वाळूज परिसरातील आरोग्य केंद्रांची पाहणी करण्याकरता गेले होते. यावेळी त्यांनी अवैध दारूची विक्री करणाऱ्या दुकानांनाही धडक भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नियमांचे पालन होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुकाने तत्काळ सील करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Last Updated : Mar 23, 2021, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details