महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जुनाबाजारात पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटकेत

शहरातील जुनाबाजार भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. घटनेची माहिती कळताच सिटीचौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेल्या चोराचा तासाभरात शोध घेऊन अटक केली.

जुनाबाजारात पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटकेत

By

Published : Aug 16, 2019, 12:24 PM IST

औरंगाबाद -जुनाबाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी तातडीने धाव घेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

जुनाबाजारात पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटकेत

शहरातील जुनाबाजार भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. घटनेची माहिती कळताच सिटीचौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेल्या चोराचा तासाभरात शोध घेऊन अटक केली. शेख फुरकान शेख सुभान असे आरोपीचे नाव आहे. एस बी आय एटिएम सेंटरचे कंत्राट असलेल्या कंपनीचे पथक मंगवळवारी दूपारी जुना बाजार परिसरात गेले होते. यावोळी त्यांना एटिएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले असता व्यवस्थापक नीलेश प्रलहादराव शेजवळ यांनी घटनेची माहिती सिटी चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजतपासले असता खबऱ्याच्या मदतीने ओळख पटवून फुरकानची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनखाली सिटीचौक पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर तासाभरात फूरकानला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details