महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Firing in Aurangabad : औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात गोळीबार ; गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न - औरंगाबादमध्ये गोळीबार

बहिणीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या कारणावरून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill by firing in Aurangabad) केल्याची घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे (Firing in Kamalapur area of Aurangabad) घडली आहे.

Firing in Aurangabad
औरंगाबाद वाळूंज औद्योगिक परिसरात गोळीबार

By

Published : Oct 15, 2022, 7:50 AM IST

Updated : Oct 15, 2022, 11:45 AM IST

औरंगाबाद : बहिणीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या कारणावरून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill by firing in Aurangabad) केल्याची घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे (Firing in Kamalapur area of Aurangabad) घडली आहे. या गोळीबारात कमळापूर येथील सागर सुभाष सदार हा गंभीर जखमी झाला आहे.‌

वाद विकोपाला जाऊन गोळीबार -आरोपी गजु मोरे याच्या बहिणीच्या आत्महत्या प्रकरणात सागर हा साक्षीदार होता. दरम्यान सागरने व्यवस्थित साक्ष न दिल्याने बहिणीचे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले. याच कारणावरून गजु मोरे आणि प्रभू चव्हाण यांनी सागरला कमळापुर फाट्यावर अडवले. यावेळी त्यांच्यात वादही झाला. हा वाद विकोपाला गेल्याने गजु मोरे आणि त्याच्या साथीदारांनी सागरला शिवीगाळ करत मारहाण (firing in Aurangabad Walanj industrial area) केली.

औरंगाबाद वाळूंज औद्योगिक परिसरात गोळीबार

उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल -या सुमारास गजु मोरेने सागरवर गावठी कट्ट्यातून सुमारे चार ते पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सागरच्या उजव्या बरगडीत लागली. तर प्रभू चव्हाण याने तलवारीने पाठीवर वार केले. यात सागर गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली (Attempt to kill by firing) आहे.

Last Updated : Oct 15, 2022, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details