औरंगाबाद - आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ) निमित्त न्यू शांती निकेतन कॉलनी, भानुदास नगर तसेच शहरातील भाविक भक्तांनी एकत्र येत पंढरपूर येथे वारीला गेलेल्या वारकऱ्यांसाठी 65 हजार लाडूंची बांधणी केली. गुळ, शेंगदाण्याचे लाडू आषाढी एकादशीला वारकऱ्यांना मोफत दिले जातात. "माझा एक लाडू पांडुरंगाला" असा हा उपक्रम असून हभप मनोज सुर्वे महाराज यांच्या नेतृत्वात राबवण्यात आला.
मागील 15 वर्षांपासून राबवला जात आहे उपक्रम -जवाहर नगर परिसरात दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष उपक्रम राबवला जातो. "माझा एक लाडू पंडुरंगाला" अस या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा हे पंधरावे वर्ष आहे. 2007 मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहिल्यावर्षी 101 लाडू पासून सुरुवात केलेला हा उपक्रम दर वर्षी वाढतच गेला, या वर्षी तो 65 हजार लाडूपर्यंत पोहचला आहे. यासाठी 1 हजार किलो शेंगादाने, 1 किलो गुळ आणि 50 किलो साजूक तूप वापरण्यात आल्याची माहिती हभप मनोज सुर्वे यांनी दिली. परिसरातील नागरिक एकत्र येत लाडू बांधणीला सुरुवात करतात. भजन कीर्तन करत पांडुरंगाचे नामस्मरण करत हा उपक्रम राबवाला जातो. एका कॉलनीत सुरु झालेल्या उपक्रणाला व्यापक स्वरूप मिळालं असून यामध्ये आता न्यू शांती निकेतन कॉलनी, भानुदास नगर, आणि शहरातील भाविक भक्तांनी एकत्र येत हा उपक्रम राबवतात. बनवलेले लाडू, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे आगोदर मंदिरात विठ्ठल रुख्माई यांना दाखविला जातो, त्यानंतर येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वाटप करण्यात येते.