महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात असदुद्दीन ओवैसींची तोफ धडाडणार, आठ ठिकाणी घेणार प्रचार सभा - Owaisi will hold eight rally in maharashtra

वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएम पक्षाने आपला स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. यामुळेच आगामी विधानसभेसाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे आठ प्रचारसभा घेणार आहेत.

असदुद्दीन ओवैसी

By

Published : Oct 3, 2019, 8:52 AM IST

औरंगाबाद -एमआयएमचे स्टार प्रचारक म्हणून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे राज्यात आठ प्रचार सभा घेणार आहेत. वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएम पक्षाने आपला स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे.

राज्यात असदुद्दीन ओवैसींची तोफ धडाडणार, आठ ठिकाणी घेणार प्रचार सभा

ओवैसी हे औरंगाबाद, मालेगाव, धुळे, पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील हे देखील मुख्य प्रचारक असणार आहेत.

हेही वाचा... 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'

2014 ची विधानसभा आणि 2019 ची लोकसभा निवडणूक लढवत मोठे मताधिक्य घेणाऱ्या एमआयएम पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. विशेषतः औरंगाबाद लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील जिंकल्याने अनेकांना निवडून येण्याचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे तिकीट वाटप झाल्यावर अनेकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. नाराजांचे बंड शमवण्याचे आव्हानही ओवैसी यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा... शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत

औरंगाबाद मध्य आणि पूर्व या दोन मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने घेतलेली मते पाहता, या दोन मतदारसंघात एमआयएमला विजयाची खात्री वाटत आहे. तसेच या दोन मतदारसंघात आणि इतर शहरात पक्षाला मिळणारा प्रतिसाद पाहता उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यात उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकांच्या बंडाचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने वेगळी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. मुस्लीम मतदारांचे एकगठ्ठा मतदान पारड्यात पाडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आठ दिवस राज्यात तळ ठोकून असणार आहेत. मात्र, मुस्लीम मतदार बांधून ठेवण्यास त्यांना जरी यश आले, तरी वंचितची साथ सोडल्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details