औरंगाबाद- आरोग्य उपसंचालक कार्यालयाने विविध पदासाठी घेतलेल्या, लेखी परीक्षेतील पात्र ५५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया गुरुवारी (२२) पार पडली. या उमेदवारांना येत्या दोन दिवसात नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी माहिती मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. एकनाथ भोसले यांनी दिली.
आरोग्य विभागातर्फे विविध पदांसाठी दोन दिवसात नियुक्तीचे आदेश या पदांसाठी भरती
आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, भांडारपाल, शिंपी, वरिष्ठ लिपिक, दंत यांत्रिकी या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती.
'रिक्त पदांची सेवेची गरज लक्षात घेऊन नियुक्ती'
आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी 28 फेब्रुवारी 2019 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील पात्र उमेदवारांना आरोग्य उपसंचालक कार्यालयात बोलावण्यात आले होते. यापैकी 55 उमेदवार हजर झाले होते. दिवसभरात कागदपत्रांची पडताळणी, उमेदवारांचे समुपदेशन प्रक्रिया पार पडल्या. या उमेदवारांना एक-दोन दिवसात नियुक्तीपत्र आदेश देण्यात येतील. उपसंचालक कार्यालय अंतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आदी ठिकाणी असलेल्या रिक्त पदांची व रुग्ण सेवेची गरज लक्षात घेऊन, नियुक्ती केली जाईल अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
हेही वाचा -प्राणवायू घेऊन 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्राकडे रवाना