औरंगाबाद-मुलीच्या घरी जेवणासाठी गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा घरी परतांना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे रूळ ओलांडतांना झाला अपघात

न्यू बालाजी नगर येथील रहिवासी बन्सीधर सूर्यभान शिंदे (वय.६५) हे मुलीच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी परतांना शिवाजीनगर येथील रेल्वे रूळ ओलांडतांना रेल्वेने दिलेल्या धडकेत ते दूर फेकले गेले. ही बाब शेजारी खेळत असलेल्या मुलांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ शिंदे कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
हेही वाचा -अखेर देवाचं दार उघडलं! मुंबईत मंदिरात बनवले कोविड सेंटर