औरंगाबाद -ऑनलाइन औषधी मागवणे किती धोकादायक आहे याबाबत अनेक वेळा जनजागृती करण्यात आली आहे. असं असलं तरी डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपी किट ऑनलाइन पद्धतीने मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. औषधी पुरवठादार ( Aurangabad Drug Seller ) असलेल्या निखिल मित्तल या व्यावसायिकाने चक्क 296 रुपयांमध्ये एक किट ऑनलाइन मिळवली ( Abortion Pill Sale Without Prescription ) आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री अवैधरित्या सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर ( Online Drug Sales Without Doctors Prescription ) आलंय. अशा ऑनलाईन विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत ( Demand For Action Against Online Vendors ) आहे.
ऑनलाइन मिळते किट, तेही डॉक्टरांची चिठ्ठी नसताना :डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आणि त्यांच्या चिठ्ठीशिवाय कुठलेही औषध घेणे हे आरोग्यास घातक ठरू शकते, हे अनेक वेळा समोर आलं आहे. त्यामुळेच मेडिकलमध्ये औषधे घेताना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शक्यतो औषध दिली जात नाहीत. मात्र गेल्या काही वर्षात ऑनलाईन पद्धतीने अनेक साहित्य मागवतात त्याच पद्धतीने औषध मागवली जात असल्याच पाहायला मिळत आहे. निर्बंध असलेली काही औषध ऑनलाइन पद्धतीने डॉक्टरची चिठ्ठी असल्याशिवाय सर्रास मिळत आहे. असाच प्रकार औरंगाबादमध्ये समोर आलाय. औषधी विक्रेते असलेले निखिल मित्तल यांनी ऑनलाइन पद्धतीने गर्भपातासाठी वापरण्यात येणारे एमटीपी किट ऑर्डर केली होती. तीन दिवसानंतर कीट त्यांना प्राप्त झाली. त्यामध्ये गर्भपाताच्या पाचगोळ्या आहेत. डॉक्टरांची कुठलीही चिठ्ठी न देता, या औषधी ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाल्याने सरकारचे निर्बंध असतानाही कशा पद्धतीने गोरखधंदा सुरू आहे हे पुन्हा एकदा समोर आलं.
Drug Sales Without Doctors Prescription : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री.. कारवाईची मागणी - डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळीची विक्री
ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची गोळी विकत मिळत असल्याचे समोर आले ( Online Drug Sales Without Doctors Prescription ) आहे. औरंगाबाद येथील एका औषध विक्रेत्याने ऑनलाईन ( Aurangabad Drug Seller ) पद्धतीने चिठ्ठी नसताही गर्भपाताची गोळी मागवली ( Abortion Pill Sale Without Prescription ) आहे. अशा प्रकारे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली ( Demand For Action Against Online Vendors ) आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या गर्भपाताची औषधी :गर्भपात करण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत. कायद्यानुसार नऊ आठवडे अथवा 63 दिवसापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपाताच्या गोळ्या देता येतात. स्वतःहून या गोळ्या घेतल्यास, अतिरीक्त रक्त स्त्राव होऊन, अर्धवट गर्भपात होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. असं असताना गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऑनलाइन पद्धतीने मिळत असतील तर हे महिलांसाठी धोक्याचे आहे असं मत स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.