महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन इफेक्ट : प्रसिद्ध कलाकारांचे प्रेक्षकांसाठी फेसबुकवर ऑनलाइन मनोरंजन - Alpviram shirang godbole

प्रख्यात गीतकार आणि लेखक श्रीरंग गोडबोले यांच्या संकल्पनेतून 'अल्पविराम' हे फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे. या पेजवर प्रख्यात अभिनेते, गीतकार, संगीतकार आपले अनुभव आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे मनोरंजनाचा वेगळा उपलब्ध झालेला हा पर्याय श्रोत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Alpviram shirang godbole
अल्पविराम फेसबुक पेज

By

Published : Mar 26, 2020, 7:18 PM IST

औरंगाबाद - देशात सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा देणारे वगळता सर्वच लोक घरीच आहेत. टीव्ही आणि त्यावरचे चित्रपट तसे अनेकांचे पाहून झालेले आहेतच. त्यात वाहिन्यांवर सुरू असलेल्या डेलीसोप तर अनेकांना कंटाळवाणे होऊ लागलेत. त्यामुळे अनेकांना घरी बसने अवघड झाले आहे. मात्र यातही आता ऑनलाइन मनोरंजन प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

प्रख्यात गीतकार आणि लेखक श्रीरंग गोडबोले यांच्या संकल्पनेतून 'अल्पविराम' हे फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे. या पेजवर प्रख्यात अभिनेते, गीतकार, संगीतकार आपले अनुभव आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे मनोरंजनाचा वेगळा उपलब्ध झालेला हा पर्याय श्रोत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

हेही वाचा...अखेर मंत्रालयातील उपहारगृह चार दिवसानंतर झाले सुरू; कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा

जीवघेण्या करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारद्वारा सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत घरी राहून कंटाळलेल्या रसिकजनांसाठी मनोरंजन क्षेत्राने काही अभिनव प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे ‘अल्पविराम’ हा फेसबुक लाइव्ह शो! सत्यजीत पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या, त्यांचा करोना विंचू, पुष्कर श्रोत्रीने करोनावर रचलेलं गाणं, संदीप खरे यांच्या कविता, सलील कुळकर्णी यांची गाणी, सुनंदन लेले आणि द्वारकानाथ संझगिरी यांचे क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबाबतचे किस्से, कविता वाचन, जादूचे प्रयोग इत्यादी धम्माल कार्यक्रमांनी खच्चून भरलेल्या अल्पविराम या फेसबुक शोला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लाइव्ह शो असल्याने वापरकर्त्यांना (यूजर्स) या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या फर्माइशी त्यांच्या आवडत्या कलाकारांना सांगता येत आहेत. शिवाय कलाकारही या फर्माईशींना दिलखुलास दाद देत आहेत. संदीप खरे यांच्या कविता सुचण्यामागे असलेल्या रंजक कथा, त्यांचे कविता वाचन, जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग इत्यादींमुळे हा लाइव्ह शो रसरशीत तर झालाच आहे शिवाय फेसबुकवर अल्पावधीत हिटही झाला आहे. जनता कर्फ्यू, लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी, करोनाचा कहर, करोनाचा प्रकोप इत्यादी इत्यादी शब्दजंजाळातून जरा लांब जात नर्मविनोदी मनोरंजनाची एक झुळूक अंगावर घेऊन ताजेतवाने व्हायला आताच्या परिस्थितीत ‘अल्पविराम’ हा एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा....लॉकडाऊन योग्यच! सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सुचवले आणखी उपाय..

गीतकार आणि लेखक श्रीरंग गोडबोले यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली असून अभिनेत्री मृण्मयी गोडबोले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी फेसबुकवर जाऊन इंडियन मॅजिक आय प्रा. लि. कंपनीच्या फेसबुक पेजवर जावे लागते. दररोज सायंकाळी सहा वाजता ‘अल्पविराम’चा लाइव्ह शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सलील कुळकर्णी, संदीप खरे, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, लीना भागवत, गिरिजा ओक, संदीप पाठक, मधुराणी प्रभुलकर, विभावरी देशपांडे, राहुल देशपांडे, नरेंद्र भिडे, कौशल इनामदार, सत्यजीत पाध्ये, द्वारकानाथ संझगिरी, सुनंदन लेले, जादूगार रघुवीर आणि अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या श्रोत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे किस्से ऐकून विरंगुळा नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details