औरंगाबाद -एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते आणि तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव करून विजय संपादन केला होता. याच विजयाचा जल्लोष म्हणून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादमध्ये विजयी रॅली काढण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये AIMIM ची विजयी रॅली, हजारोंचा जनसमुदाय सामील - विजयी रॅली
लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जनतेचे आभार मानण्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून विजयी रॅलीचे आयोजन
आज आझाद चौक ते भडकल गेट दरम्यान विजयी रॅली काढण्यात आली आहे. लोकसभेच्या विजयानंतर आज विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला कार्यकर्त्यांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. हजारोच्या संख्येने तरुण कार्यकर्ते डीजे आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरताना पाहायला मिळत आहे. रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता विधनसभेपूर्वी एमआयएम शक्ती प्रदर्शन तर करू पाहत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या रॅलीची सांगता भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. तेथे खासदार जलील जनतेला संबोधीत करणार आहेत.