औरंगाबाद - महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत आपला पक्ष (एआयएमआयएम) हा सर्व जागांवर निवडणूक रिंगणात उतरणार आहे. याबाबतची घोषणा पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी केली आहे. ते औरंगाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, सर्व जागा लढाव्यात की नाही यावर पक्षांतर्गत चर्चा झाली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता उमेदवारांची चाचपणी सुरू आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.
राज्यातील पक्षांतर्गत बाबींची चाचपणी
ओवेसी हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरूवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीव ओवेसी सध्या राज्यातील पक्षांतर्गत बाबींची चाचपणी करत आहेत. तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होत असल्याने त्यानुसार नियोजन होत असल्याचेही ते म्हणाले आहेत.