महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकत्रित येणाऱ्या गणेशोत्सव-मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहरात एकता रॅलीचे आयोजन..

पुढील महिन्यात एकत्रित येणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम या उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहरात एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक आणि विविध शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या र‌ॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

By

Published : Aug 29, 2019, 9:30 AM IST

अहमदनगर शहरात एकता रॅली

अहमदनगर -यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम हे हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांचे प्रमुख उत्सव एकत्रित येत असल्याने पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. याच हेतूने दोन्ही समाज बांधवांनी उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरे करावेत, या हेतूने बुधवारी अहमदनगर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सव-मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहरात एकता रॅलीचे आयोजन

गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने होणारी मोठी गर्दी नियंत्रित ठेवणे, सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे, कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि दोनही धर्मीय समाज बांधवांनी दोन्ही उत्सव शांततेत आणि आनंदी उत्साही वातावरणात साजरे करावेत, या हेतूने बुधवारी अहमदनगर शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजेत; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यापासून ह्या रॅलीला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीस प्रारंभ केला. शहरातील विविध विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी सामाजिक सलोखा, धार्मिक एकता आणि आणि उत्सवाचे महत्त्व विशद करणारे फलक हातात घेऊन 'हम सब एक हे ' चा नारा देत नागरिकांना गणेशोत्सव आणि मोहरम शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले. शहरातील रामचंद्र खुंट" नगर अर्बन बँक, महत्मा गांधी रोड चितळे रोड, दिल्लीगेट मार्गे ही रॅली जिल्हा पोलिस मुख्यालयात आली, या ठिकाणी या रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा - अहमदनगर : अण्णाभाऊ साठे जंयतीनिमित्त 'विठ्ठल उमप' पुरस्काराचे वितरण

पोलीस प्रशासनासोबतच पत्रकार संघटना, विविध सामाजिक आणि राजकीय संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर शहरातील विविध शालेय विद्यालयाच्या सहभागाने एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संजीव कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्यासह सामाजिक संघटना, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - शिर्डीत ३४ लाखांच्या दारूसह दोन आरोपी अटकेत​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details