औरंगाबाद- खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन केले. होशियारी कमिटीने दिलेला अहवाल कर्मचाऱ्यांच्या हिताचा नसल्याने त्या अहवालाची होळी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
खाजगी कर्मचाऱ्यांना एक हजार ते दीड हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते. मात्र, महागाईच्या काळात हे वेतन पुरेसे नसल्याने किमान साडेसात हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी आंदोलक वृद्ध कर्मचाऱ्यांनी केली. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या EPS95 नॅशनल एजिटेशन कमिटीतर्फे मराठवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने केली.