औरंगाबाद - 34 वर्षांच्या राजकारणा नंतर अखेर राज्य सरकारने संभाजीनगर ( Maharashtra government approved proposal of Sambhajinagar ) नावाचा प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानंतर जिल्ह्यात शिवसैनिकांनी ( Uddhav Thackeray on Sambhajinagar) जल्लोष केला. उशिरा का होईना न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 1988 नंतर प्रत्येक ( Sambhajinagar name change ) निवडणूक प्रचारात सेनेने याच मुद्द्यावर प्रचार करत राजकारण ( Shivsena on Sambhajinagar name ) केल होते. आता नामांतराचा चेंडू केंद्राकडे टोलावला आहे.
हेही वाचा -Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक, शहरात शक्तिप्रदर्शन
1988 मध्ये केली होती घोषणा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे 1988 मध्ये संभाजीनगर नावाची घोषणा केली. ज्या औरंगजेबाने आपल्यावर अन्याय केला, त्याचं नाव शहराला नको, अशी भूमिका घेत संभाजीनगर नाव देण्याचा प्रस्ताव पुढे केला. 1995 मध्ये हा ठराव सर्वसाधारण सभेत मनपाने मंजूर करत, राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, 1996 मध्ये त्यावेळचे काँग्रेस नगरसेवक मुस्ताक अहमद यांनी या नावाला विरोध करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 1999 मध्ये राज्यात युती सरकार आले तरी मात्र नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नव्हता.
2002 मध्ये मुस्ताक अहमद यांनी दाखल केलेली याचिका निकाल निघाली आणि नामांतराला कुठेतरी पूर्णविराम मिळाला असे वाटले होत. 2010 मध्ये संभाजीनगरच्या मुद्द्यावरच शिवसेना भाजपने महानगरपालिका जिंकली होती. 2014 मध्ये युतीचे पूर्ण बहुमताचे सरकार येऊन देखील नामांतराचा मुद्दा मार्गी लागला नव्हता. 2019 मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे, हे दोन पक्ष असल्याने आता नामांतर होईल का नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता.
अचानक आला प्रस्ताव -मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या झालेल्या सभेत आता शहराचा विकास झाल्यावरच शहराला संभाजी महाराजांचे नाव देऊ असा पवित्रा घेतला. आता नामांतर होणार नाही, संभाजीनगरचा मुद्दा आता कायमचा बंद झाला असे बोलल गेले. अचानकच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार पायउतार होणार, असे लक्षात येताच राजीनामा देण्याच्या अवघ्या काही तसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'संभाजीनगर'चा प्रस्ताव मंजूर करून घेतला, तोही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने.
भविष्यात सरकार कधी सत्तेत येईल हे माहित नाही. त्यात नामांतराच प्रस्ताव सेनेनेच पास केला हे भविष्यात भाजपला दाखवून देण्यासाठी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव शहराचे नाव बदलास विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना घेऊन मंजूर करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात 'संभाजीनगर'च्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपले राजकारण कायम ठेवले असे म्हणावे लागेल.
कोण होते संभाजी महाराज? -औरंगाबादचा विषय निघातो तेव्हा संभाजीनगर हे नाव आठवते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर शहराला संभाजीनगर हे नाव ठेवण्याचा प्रस्ताव 1988 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी मांडला होता. तेव्हापासून या प्रसत्वाचा राज्यातील पक्षांनी निवडणुकांमध्ये उल्लेख केला आहे. आता 34 वर्षांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरे सरकारने मजूर केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला. आता औरंगाबदचे नाव संभाजीनगर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबादला पराक्रमी, धाडसी संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार असून आपण त्यांच्याबाबत जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे यांचा जन्म 1657 साली पुरंदर किल्ल्यात झाला होता. पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. ते लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केला. शिवाजी महाराजांचे त्यांच्यावर अपार प्रेम होते. बालपणापासूनच संभाजी महाराज राजकारणातील डावपेच, गनिमी कावा आदी गोष्टी लवकर आत्मसात करत होते.
संभाजी महाराज 9 वर्षांचे होते तेव्हा ते राजपूत राजा जय सिंहकडे कैदेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा दौऱ्यावेळी संभाजी राजे त्यांच्या सोबत होते. औरंगजेबला चकमा देऊन शिवाजी महाराज आग्राहून निघाले तेव्हा संभाजी महाराज त्यांच्यसोबत होते. संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. 1666 साली ते राजगडावर सुरक्षित पोहचले. संभाजी महाराजांनी अल्पशा काळात खूप मोठे पराक्रम केले होते. त्यांनी कमी वेळेत मराठा साम्राजाचा विस्तार केला होता व त्याची सुरक्षा केली होती. संभाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून औरंगजेबला परेशान करून सोडले होते. त्यांनी 120 युद्ध लढले होते.
शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर 1680 मध्ये संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. महाराजांनी मराठी साम्राज्याची धुरा आपल्या हातात घेतली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी मुगलांशी दोन हात करण्यास सुरुवात केली होती. बुरहानपूर शहरावर त्यांनी हल्ला केला. यानंतर मुगलांशी त्यांची दुश्मनी वाढली. 1989 च्या सुमाराला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले होते. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजी महाराजा रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण, संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अत्याचार असह्य होऊन संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा -Udaysingh Rajput Dance : उदयसिंह राजपुत "मैं हू डॉन" गाण्यावर थिरकले; पाहा व्हिडिओ