महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sena Advertising Controversy : शिवसेना माजी नगरसेवकाच्या बॅनरवरचा मजकूर वादाच्या भोवऱ्यात - बॅनरवरचा मजकूर वादाच्या भोवऱ्यात

जास्त ताणू नका ताण नाहीतर उलटा घुसेल बाण, शेंडी जाणव्याला हद्दपार कार्य, अशी ही जाहिरात असून शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे ( Former Shiv Sena corporator Chetan Kamble advertised ) यांनी दिली आहे. माजी स्वीकृत नगरसेवक चेतन कांबळे यांनी दिलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामुळे या जाहिरातीवर भाजपाने जोरदार टीका केली आहे.

corporator Chetan Kamble
corporator Chetan Kamble

By

Published : Jun 8, 2022, 3:55 PM IST

Updated : Jun 8, 2022, 4:06 PM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जास्त ताणू नका ताण नाहीतर उलटा घुसेल बाण, शेंडी जाणव्याला हद्दपार कार्य, अशी ही जाहिरात असून शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे ( Former Shiv Sena corporator Chetan Kamble advertised ) यांनी दिली आहे. माजी स्वीकृत नगरसेवक चेतन कांबळे यांनी दिलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामुळे या जाहिरातीवर भाजपाने जोरदार टीका केली आहे.

प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक चेतन कांबळे



'महापुरुषांचा अनुयायी असल्याने दिली जाहिरात' : फुले, शाहू, आंबेडकरांनी शेंडी जाणव्याच्या विचारांचा विरोध केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार देखील तसेच होते. कोणत्या जातीचा द्वेष किंवा तिरस्कार नसून एका वृत्तीचा विरोध आहे. शिवसेना आता तळागाळात जाऊन काम करताना आपली विचारधारा बदलत आहे. आंबेडकरी जनतेच्या वतीने ही जाहीरात दिली असल्याचा खुलासा चेतन कांबळे यांनी केला आहे.

हेही वाचा -CM Thackeray Rally Aurangabad : फाटक्या कपड्यातला कट्टर शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांसाठी केला 6 कोटी 75 लाख वेळा 'रामनाम जप'

Last Updated : Jun 8, 2022, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details