महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंशतः टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी प्रशासनाची पाहणी मोहीम - औरंगाबाद कोरोना कहर बातमी

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने औरंगाबादेत 11 मार्च ते 4 एप्रिल अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाजार पेठांमध्ये काही निर्बंध प्रशासनाने लावले. लावलेल्या नियमांचे पालन होते की नाही? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त थेट रस्त्यावर उतरले होते.

administration officer surprise visit to shop in Aurangabad
पाहणी करताना

By

Published : Mar 11, 2021, 8:35 PM IST

Updated : Mar 11, 2021, 9:26 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाजार पेठांमध्ये काही निर्बंध प्रशासनाने लावले. लावलेल्या नियमांचे पालन होते की नाही? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त थेट रस्त्यावर उतरले होते.

पाहणी करताना अधिकारी

अचानक केली तपासणी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी दोनच्या सुमारास औरंगाबादचा मुख्य बाजारपेठांमध्ये एकत्रच पाहणी करायला सुरुवात केली. रस्त्यावरील असलेल्या दुकानांमध्ये व्यापारी आणि ग्राहक मास्क वापरतात का, ग्राहक दुकानात आल्यावर त्यांचे शाररिक तापमान आणि ऑक्सिजन मात्रा तपासली जाते क, याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई यावेळी करण्यात आली.

शहरातील विविध भागांमध्ये पाहणी

गुरुवारी (दि. 11 मार्च) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांनी एकत्रितरित्या पाहणी सुरू केली. दुपारी सर्वात पहिले क्रांतीचौक भागात दुकानाची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर बाबा पेट्रोल पंप परिसरात हॉटेल्समध्ये जाऊन कशा पद्धतीने ग्राहकांना सेवा दिली जाते. नियमांचे पालन केले जात आहे का? याबाबत पाहणी केली. आजपासून हॉटेलमध्ये क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या नियमांचे पालन होत आहे का हे पाहण्यात आले. ज्या हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन केला असेल त्यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. एका भागातून दुसऱ्या भागात जात असताना ज्या-ज्या ठिकाणी विनामास्क वावरणारे नागरिक दिसून आले त्या सर्वांना ताकीद देण्यात आली. यापुढे कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई ही केली जाणार असून वेळप्रसंगी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा -12व्या ज्योतिर्लिंग रुपात घृष्णेश्वर मंदिरात महादेवाचा वावर!

हेही वाचा -महाशिवरात्रीला यंदा वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर राहणार बंद; भाविकांचा हिरमोड

Last Updated : Mar 11, 2021, 9:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details