औरंगाबाद- जिल्ह्यातील सेनेचे पाचपैकी चार आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता शिवसेनेतर्फे मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासोबत पक्षश्रेष्ठींसह नेतेमंडळी बैठक घेऊन पुढील रूपरेषा आखत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बैठकांचे बैठक घेण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरे दाखवणार ताकद?- औरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) , पैठण मतदारसंघाचे संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre of Paithan Constituency ) , मध्य मतदारसंघाचे प्रदीप जैस्वाल ( Pradeep Jaiswal ) तर वैजापूरचे रमेश बोरनारे ( Ramesh Bornare of Vaijapur ) हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. आता याच मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे शिवसेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शुक्रवारी वैजापूर येथे दुपारच्या सुमारास शिवसैनिकांचा मेळावा आयोजित ( Vaijapur shivsena ) करण्यात आला आहे. तर पश्चिम आणि मध्य या मतदारसंघांसाठी शुक्रवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे. त्यापूर्वी जालना रोड येथे आदित्य ठाकरे रोड शो करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या शिवाय देखील शिवसेनेची ताकद आहे आणि त्यानंतरही राहील असा संदेश आदित्य ठाकरे या निमित्ताने देणार आहेत.
यांच्या विरोधात आदित्य ठाकरे घेणार मेळावे...आमदार संदिपान भुमरे हे तीन वेळा शिवसेनेच्या पक्षचिनावर आमदार म्हणून निवडून आले. मंत्री झाल्यामुळे मिळालेली संधी ही फक्त शिवसेनेमुळे मिळाली होती. अशा पद्धतीने गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांनी टीका केली आहे. एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून असलेल्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेमुळे राजकारणात प्रवेश मिळाला. ते आमदार आणि मंत्री होऊ शकले.
सलग तीन वेळा आमदार संजय शिरसाट-संजय शिरसाट हे पश्चिम मतदार संघाचे आमदार असून आधी ते रिक्षा चालक होते. 1990 च्या सुमारास ते शिवसेनेत आले. त्यानंतर नगरसेवक आणि त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. औरंगाबाद मध्ये प्रदीप जयस्वाल 1988 नंतर सलग सेनेच्या वतीने निवडणूक जिंकत आले. पहिले नगरसेवक, सेनेचे पहिले महापौर खासदार आणि नंतर आमदार अशी संधी त्यांना शिवसेनेमुळे मिळाली. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गटासोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे मूळ असलेला शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झाला आहे.