औरंगाबाद - मारहाण करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन जाता असताना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली. अमर भाऊसाहेब गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर भाऊसाहेब गायकवाड (रा.मुकुंदवाडी) याला मुकुंदवाडी परिसरात मारहाण करून पैसे लुटल्याप्रकरणी अटक केली होती. बुधवारी दुपारी त्याने एकाच्या खिशातून २, ७०० रुपये लुटले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर गायकवाड याला अटक केली होती. पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते.
हातकडी टोचत असल्याचा बनाव करून आरोपीचे पोलिसांसमोर पलायन - Mukundwadi Police Thane news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर भाऊसाहेब गायकवाड (रा.मुकुंदवाडी) याला मुकुंदवाडी परिसरात मारहाण करून पैसे लुटल्याप्रकरणी अटक केली होती. बुधवारी दुपारी त्याने एकाच्या खिशातून २, ७०० रुपये लुटले.
आरोपी
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
न्यायालयात हजर करण्यासाठी अमर गायकवाड याला पोलिस ठाण्यासमोर वाहनात बसविले. यावेळी त्याने हातातील हातकडी टोचत असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे एका हातातून हातकडी दुसऱ्या हातात लावत असताना अमरने पोलिसांच्या हाताला झटका देवून पलायन केले. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पसार झाला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.