औरंगाबाद - शहरातील व्यावसायिक वाहने चोरून ती इतर जिल्ह्यात विक्रीच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या त्रिकुटास सिडको एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. साबेर शब्बीर पठाण, जावेद गणी शेख, शेख माजेद शेख अकबर (सर्व रा. औरंगाबाद ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे.
औरंगाबादेत चोरलेली वाहने सिंधुदुर्गात विकण्याच्या तयारीत असलेले त्रिकुट जेरबंद - जावेद गणी शेख
काही दिवसापासून शहरातील व्यावसायिक वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी एक गुन्हा एमआयडीसी सिडको ठण्यात दाखल होत. या प्रकरणी खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी शेख शब्बीरला ताब्यात घेतले.
काही दिवसांपासून शहरातील व्यावसायिक वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी एक गुन्हा एमआयडीसी सिडको ठण्यात दाखल होत. या प्रकरणी खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी शेख शब्बीरला ताब्यात घेतले. त्याने ही वाहने इतर साथीदार जावेद आणि माजेदच्या मदतीने चोरी केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ठेवण्यात आली आहे अशि माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी दोघांचा शोध घेत सिंधुदुर्ग येथून चोरी केलेली वाहने जप्त केली. अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांनी दिली आहे.