महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला आगीत ९५ टक्के भाजली होती. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अंधारी सिल्लोड woman was burnt alive
महिलेला जिवंत जाळले

By

Published : Feb 6, 2020, 6:56 AM IST

औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत ही महिला ९५ टक्के भाजली होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

हेही वाचा... धक्कादायक..! औरंगाबादमध्ये घरात घुसून महिलेला जिवंत जाळले

अंधारी येथील ही महिला आगीत ९५ टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली असून, त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला घरात एकटी राहत होती. २ फेब्रुवारी रोजी गावातील संतोष मोहिते हा तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले व घराची कडी लावून पळून गेला. महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या शेजाऱ्यांनी तिथे जात आग नियंत्रणात आणली व पीडितेला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा... शरीर सुखासाठी नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले

ABOUT THE AUTHOR

...view details