महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाजूला सरका म्हणताच पोलिसांवर भडकले अब्दुल सत्तार!

बंदोबस्तावर असलेले पोलीस नाईक संजय भोकरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना आपण थोडे बाजूला जाऊन थांबा. वरिष्ठ आम्हाला बोलतील, असे सांगत बाजूला जाण्याची विनंती केली. भोकरेंचे हे शब्द एकताच सत्तार बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले.

abdul sattar angry
abdul sattar angry

By

Published : Mar 21, 2021, 5:12 PM IST

Updated : Mar 21, 2021, 5:34 PM IST

औरंगाबाद - साहेब जरा बाजूला थांबा, असे म्हणताच राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अमलदारावर भडकले. यामुळे बराचवेळ येथे गोंधळ सुरू होता. ही घटना आज सकाळी क्रांतीचौकाजवळील मतदान केंद्रावर घडली.

मतदान केंद्रावर गोंधळ

आज सकाळी 8पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली अधिक माहिती अशी, की क्रांतिचौकजवळील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात मतदानाचे केंद्र असून आज सकाळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तेथे आले. पदाधिकारी व इतर उमेदवारांसह ते केंद्राजवळ चर्चा करीत थांबले होते. यावेळ तेथे बंदोबस्तावर असलेले पोलीस नाईक संजय भोकरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना आपण थोडे बाजूला जाऊन थांबा. वरिष्ठ आम्हाला बोलतील, असे सांगत बाजूला जाण्याची विनंती केली. भोकरेंचे हे शब्द एकताच सत्तार बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले. यावेळी मतदान केंद्रावर बराच गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मध्यस्थी केली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सत्तार यांची समजूत काढली व प्रकरण शांत झाले.

अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी शिघ्रकृती दल

मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिघ्रकृती दलासह विविध विभागातील पथके घटनास्थळी बोलावण्यात आले.

Last Updated : Mar 21, 2021, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details