औरंगाबाद- इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वाहन वापरणे परवडत नसल्याने औरंगाबादच्या एका व्यक्तीने दुचाकीऐवजी अश्व वापरण्यास सुरुवात ( Man Use Horse For Travelling ) केली आहे. युसुफ शेख, असे त्यांचे नाव असून ते एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहे. घेड्यावरून शहरात फिरत असल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
घोड्यावरुन रोज होतो 30 किलोमीटर प्रवास ...
इंधन दरवाढ ( Petrol Rates Hike ) व नवीन वाहनांचे वाढलेले दर ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब झाली आहे. युसुफ शेख यांच्याकडे असलेले वाहन जुने झाले असून त्यात पेट्रोल अधिक लागत असल्याने ते त्रस्त होते. मिटमिटा भागातून नोकारीच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी 30 किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे युसुफ यांनी घोड्यावर जाण्याच ठरवले. मागील सहा महिन्यांपासून ते रोज त्यांच्या कामाच्या ठिकाणी घोड्यावरून ये-जा करू लागले. शहरात ज्या ठिकाणी त्यांना काम असते त्या ठिकाणी ते घोड्यावरून प्रवास करतात. इतकेच नाही तर कौटुंबिक समारंभातही ते घोड्याचा वापर करू लागले. घोडा वापरत असताना वेगळाच आनंद मिळत असल्याचे युसुफ यांनी सांगितले.
पैशांची होत आहे बचत ...