औरंगाबाद - जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत हा दरोडा टाकण्यात आला असून, ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भर दिवसा पंपावर टाकला दरोडा
औरंगाबाद - जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत हा दरोडा टाकण्यात आला असून, ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भर दिवसा पंपावर टाकला दरोडा
तिसगाव येथील हर्ष पेट्रोल पंप येथे गुरुवारी दि 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पंपवरील मॅनेजर आणि तीन कर्मचारी पैसे मोजत होते. अचानक तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी केबिनमध्ये येऊन ऑनलाइन पेमेंट बाबत विचारणा केली. त्यातच एकाने बंदूक, तर दुसऱ्याने गुप्ती काढून पैसे देण्याची मागणी केली. यामध्ये एका कर्मचाऱ्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने बंदूक ताणल्याने केबिनमधील कर्मचारी जिवाच्या भीतीने काही करू शकले नाहीत. त्यातच आरोपींनी जवळपास एक लाख तीस हजार रुपये घेऊन पळ काढला.
पंपवरील ग्राहकांनी घेतली बघ्याची भूमिका
सकाळी साडेदहाच्या सुमारास घातलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडली त्यावेळी पंपावर पन्नास ते साठ ग्राहक उपस्थित होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे कोणाला काही कळले नाही. गोंधळ उडाला, पंपावरील कर्मचारी ओरडत असताना, कोणीही दरोडेखोरांना अडवण्यासाठी समोर आले नाही. या प्रकरणी दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, याबाबत पुढील तपास सुरू पोलिस विभाग करत आहे.