महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद : सासूरवाडीच्या त्रासाला कंटाळून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; पत्नी आठ महिन्याची गर्भवती - औरंगाबाद सासूरवाडीच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

विश्रांती नगर परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने सासूरवडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

aurangabad latest news
aurangabad latest news

By

Published : Sep 14, 2021, 8:08 PM IST

औरंगाबाद - 'मी सासूरवडीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून माझ्या संसारात सासू व आत्येसासू ढवळाढवळ करत आहे' अश्या मजकुराची चिठ्ठी लिहीत विश्रांती नगर परिसरातील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

पत्नी आठ महिन्याची गर्भवती; पतीची आत्महत्या -

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण नारायण थोरात (30) रा. विश्रांती नगर एन 7 सिडको, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा एक्सिस बँकेत शिपाई म्हणून कामाला होता. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. त्याची पत्नी आठ महिन्याची गर्भवती आहे. मंगळवार पत्नी आत्याच्या घरी जेवणासाठी गेली होती. यावेळी घरात एकटाच असलेल्या प्रवीणने राहत्या घरात सीलींग फॅनला गळफास लाऊन आत्महत्या केली. दरम्यान, पत्नी घरी आल्यानंतर घरात आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितले असता प्रवीणने गळफास घेतला होता. यावेळी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रवीणने लिहिली चिठ्ठी -

घरात प्रवीणने चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठी 'मी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या संसारात आत्येसासू व सासू हे ढवळाढवळ करत आहेत. माझ्या आत्महत्येस सासरावडीचे लोक जबाबदार आहेत. आपला विश्वासू प्रवीण थोरात' असे लिहीले होते.

हेही वाचा - पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 2 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक; 'हा' होता धक्वादायक डाव

ABOUT THE AUTHOR

...view details