औरंगाबाद - दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या 24 वर्षीय विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली ( woman commits suicide by hanging in Aurangabad ) आहे. ही घटना बजाजनगर भागात आज ( 28 मे ) पहाटे समोर आली. जयश्री रितेश पाटील ( वय-२४ ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. जयश्री पाटील हिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Aurangabad Woman Suicide : दोन महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या; वर्षभरापूर्वीच झालेलं लग्न - Aurangabad Woman Suicide
दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या 24 वर्षीय विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या ( woman commits suicide by hanging in Aurangabad ) केली आहे. ही घटना बजाजनगर भागात आज ( 28 मे ) पहाटे समोर आली.

अधिक माहिती अशी की, शनिवारी ( 28 मे ) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जयश्रीने राहत्या घरी सिलिंग पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जयश्रीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयश्रीला मृत घोषित केले. जयश्री मृत झाल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन गृह गाठले. यावेळी नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. वाद वाढू नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्रीच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
TAGGED:
Aurangabad Woman Suicide