औरंगाबाद -येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने वसतिगृहात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ( Girl Committed Suicide By Hanging Aurangabad ) आहे. ही घटना शनिवारी ( दि. 26 ) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.
वैष्णवी रमेश काकडे ( वय 22 रा. धानोरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद ) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. वैष्णवीचे वडील शेतकरी आहेत. वैष्णवी ही घरात मोठी मुलगी होती. तर तिला एक भाऊ आणि बहिण होती. वैष्णवी नातेवाईकांच्या लग्नासाठी गावी गेली होती. 21 मार्चनंतर ती औरंगाबादला परत आली होती. आज ( शनिवार ) तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.
मैत्रींनीनी पाहिले अन्...
औरंगाबाद येथील जुब्ली पार्कमध्ये वैष्णवी आपल्या पाच मैत्रिणींसोबत राहत होती. यातील तीन मुली काही दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. यामुळे वैष्णवी आणि दोन मैत्रिणी शुक्रवारी खोलीत होती. रात्री जेवण झाल्यानंतर तिघींनी समोरच्या खोलीत झोपण्याचे ठरवले. दोनच्या सुमारास दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या. तेव्हा वैष्णवीने मी फोन बोलत आहे, तुम्ही झोपा, असे सांगितले. यावेळी वैष्णवी फोनवर कोणाशी तरी भांडत सुरू असल्याचा मैत्रिणींना आवाज आला. मात्र, मागील तीन दिवसांपासून असेत वाद सुरु असल्याने मैत्रिणींनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजता एक मैत्रीण उठून मागे चार्जर घेण्यास गेली असता वैष्णवीने गळफास घेतल्याचे तिने पाहिले.