महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पंधरा वर्षीय मुलाने सायकल खेळण्याचा बहाना करून पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

pundaliknagar police station
पुंडलिक नगर पोलीस स्टेशन

By

Published : Oct 27, 2021, 8:28 PM IST

औरंगाबाद - एका सोसायटीत पंधरा वर्षीय मुलाने सायकल खेळण्याचा बहाना करून पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गारखेडा परिसरामध्ये जालना जिल्ह्यातील कुटुंब राहते. सदस्य घरात असताना पाच वर्षांची चिमुकली खेळत होती. त्यावेळी परिसरात राहणारा एक पंधरा वर्षीय मुलगा तिथे आला. त्याने मुलीला सायकल खेळण्याचे आमिष दाखवले. मुलीला सायकल खेळायची असल्याने तिने त्या मुलाला सायकल खेळण्यास होकार दिला. याचाच फायदा घेऊन त्याने त्या मुलीला काही अंतरावर घेऊन गेला. त्याने मुलीला चारचाकी वाहनांच्या मधोमध घेऊन जात अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार पाहून मुलगी घाबरून गेली. यावेळी काही अंतरावरून जात असलेल्या महिलेचे लक्ष त्या मुलाकडे गेले. ते पाहून मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी तत्काळ पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठत संपूर्ण हकीकत सांगितली.

  • घटना सीसीटीव्हीत कैद -

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुंडलिक नगर पोलिसांनी पीडितेचे घर गाठून संपूर्ण प्रकार ऐकून घेतला. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली होती. आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावले. आपला मुलगा असं काहीच करू शकत नाही असे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखवताच मुलाच्या वडिलांनी डोक्याला हात लावला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • मोबाईलचा दुरुपयोग -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लोकडाऊन लागलं. यामुळे शाळा देखील बंद झाल्या होत्या. यावर पर्याय शोधत सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. यासाठी पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले. मात्र, काही विद्यार्थ्यांनी या मोबाईलचा दुरुपयोग केला. यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा -पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सात दिवस आत्याचार, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details