महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

12 वर्षीय मुलीची आत्महत्या, कारण अस्पष्ट - औरंगागबाद लेटेस्ट न्यूज

हडको एन-11 परिसरातील नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिडको पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

12 वर्षीय मुलीची आत्महत्या, कारण अस्पष्ट
12 वर्षीय मुलीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By

Published : Jun 25, 2021, 7:08 AM IST

औरंगाबाद- 12 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडको एन-11 परिसरातील नवजीवन कॉलनीत घडली. अस्मिता संतोष वाघले असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी सिडको पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

आई-वडील घरी नसल्याची संधी साधत केली आत्महत्या

प्रतिभा पाटील शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अस्मिताला सहा वर्षांचा एक भाऊ आहे, तर वडील खासगी कंपनीत कामाला असून आई मेसवर पोळ्या करण्याचे काम करते. त्यामुळे आई-वडील दोघेही कामावर गेल्यानंतर अस्मिता व तिचा लहान भाऊ दोघे घरी असतात. बुधवारी संध्याकाळी आई मेसवर पोळ्या करण्यासाठी गेली असता अस्मिताने घराचा मुख्य दरवाजा लोटला व समोरील खोलीतच छताच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतला. भावाला हा प्रकार कळाल्यानंतर त्याने आरडाओरड केली. तिचे मामा प्रदीप भुसारे यांनी अस्मिताला फासावरुन उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलिसात नोंद करण्यात आली आहे. अस्मिताने आत्महत्या का केली? याबाबत पोलीस तपास करत असून, अस्मितावर तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

हेही वाचा -डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणीचे दामिनी पथकाने केले समुपदेशन

ABOUT THE AUTHOR

...view details