महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशात दर तासाला 12 मुले चोरीला? सतर्क राहण्याचे पालकांना आवाहन - National Crime Records Bureau

गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलांच्या चोरीच्या घटना घडत असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. मात्र त्या अफवा असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात येत असले तर भारतात प्रत्येक तासाला 12 मुलं गायब होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं, असे आवाहन महिला बाल कल्याण समिती Women Child Welfare Committee अध्यक्ष ऍड आशा शेरखाने- कटके यांनी केले आहे.

Children Kidnapped
Children Kidnapped

By

Published : Oct 18, 2022, 7:07 PM IST

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलांच्या चोरीच्या घटना घडत असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. मात्र त्या अफवा असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात येत असले तर भारतात प्रत्येक तासाला 12 मुलं गायब होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं, असे आवाहन महिला बाल कल्याण समिती Women Child Welfare Committee अध्यक्ष ऍड आशा शेरखाने- कटके यांनी केले आहे.

देशात दर तासाला 12 मुले चोरीला

मुले गायब होणे चिंताजनकनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो National Crime Records Bureau अहवालानुसार देशात प्रत्येक तासाला 12 मुले गायब होतात. त्यापैकी अनेक मुलं सापडत नाहीत, अस धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सन 2020 ची आकडेवारीनुसार जवळपास 60000 मुलं गायब झाली आहेत. तर पुढील वर्षात देखील अशीच परिस्थिती आहे. याची वेगवेगळी कारण सांगितली जातात आणि ही चिंतेची बाब असून याबाबत पालकांनी विचार करण्याची गरज असल्याचे मत बालकल्याण समिती अध्यक्ष ऍड आशा शेरखाने- कटके यांनी व्यक्त केले आहे.

सोशल मीडियामुळे वाढले प्रमाणमोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. त्यात लहान मुलांच्या हातात आता मोबाईल असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लोकांच्या संपर्कात येणं सोपं झाल आहे. त्यात आता आई- वडिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषता आई- वडील घरी नसतात. त्यावेळी अनोळखी माणसाच्या संपर्कात मुलं येतात का ? हे देखील बघायची गरज आहे.

2 वर्षा आधी घरी कोणी नसलं, तरी मुलं जगाच्या संपर्कात येत नव्हती. मात्र कोरोनामुळे मोबाईल हातात आला. आणि शिक्षणापेक्षा सोशल मीडियाच्या संपर्कात मुलं मोठ्या प्रमाणात येत आहे. त्याचाच गैरफायदा घेत काही लोक मुलांना फुस लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच माध्यमातून मुलांना गायब होत असल्याची शक्यता ऍड आशा शेरखाने- कटके यांनी वर्तवली आहे.

मुलांना चुकीच्या मार्गाला लावण्याची शक्यतागायब झालेल्या मुलांचा वापर गैरकृत्य करण्यासाठी केला जात असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यात बालकामगार म्हणून मुलांचा वापर करणे, भीक मागण्यासाठी मुलांना लावणे, अवयव विकण्यासाठी किंवा लहान मुलांची तस्करी करण्यासाठी मुलांची चोरी करणे असे प्रकार अनेकवेळा समोर येत आहेत. इतकच नाही तर कामाच्या स्वरूपानुसार त्या मुलांचं वय असतं. यात मुलं किंवा मुली यांचं प्रमाण स्पष्टपणे सांगता येत नाही. मात्र कोणत्या कामासाठी मुलं घ्यायची, त्यानुसार त्यांना गायब केलं जातं असं मत ऍड आशा शेरखाने- कटके यांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याची गरजलहान मुलं गायब होण्याची समस्या चिंताजनक आहे. दरवर्षी हे प्रमाण नियंत्रणात आणायचा असेल, तर नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती असेल, तर त्याबाबत लक्ष ठेवणे किंवा त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. इतकच नाही तर आपली मुलं कोणत्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात तर येत नाही ना ? याकडे देखील लक्ष ठेवलं तर निश्चितच मुलं चोरीला जाणार नाहीत. पण त्यासाठी नागरिकांनी आपलं सामाजिक भान समजून सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत ऍड आशा शेरखाने- कटके यांनी व्यक्त केले आहे.

आकडेवारी बाबत पोलिसांना शंकानॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो तर्फे समोर आलेल्या आकडेवारीबाबत पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. एखाद्या मुल काही कारणास्तव घरातून निघून जाते किंवा बाजारपेठेत मुलं हरवतात, अशा घटनांमध्ये मुलं गायब झाल्याबाबत तक्रार नोंदवल्या जातात. मात्र अशा घटनांमध्ये अनेकवेळा मुलं सापडतात किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना घरी आणून सोडतात, अशा वेळेस त्याची आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे सदरील आकडेवारी बाबत काही शंका व्यक्त केली जाऊ शकते, असे पोलीस विभागाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details