महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद : अभ्यासात प्रगती नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - undefined

माझी अभ्यासात प्रगती नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. पाठांतर करता येत नाही. केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येकजण येऊन अभ्यासाविषयीच बोलतो. वर्गात मुलेही हासतात. मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याचे चिठ्ठी लिहून दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

By

Published : Oct 11, 2021, 7:33 AM IST

औरंगाबाद -माझे दहावीचे वर्ष आहे. माझी अभ्यासात प्रगती नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. पाठांतर करता येत नाही. केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येकजण येऊन अभ्यासाविषयीच बोलतो. वर्गात मुलेही हासतात. मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याचे चिठ्ठी लिहून दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निखील सुनील लोळगे (१६) रा. एन ९, सिडको, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

चिठ्ठीत लिहून केली आत्महत्या -

निखील हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर त्याच्या खोलीत झाेपण्यासाठी साडेनऊ वाजता गेला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्याची आई उठविण्यासाठी गेली असता, त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यास खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. निखीलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. त्यात त्याने माझे दहावीचे वर्ष आहे. माझी अभ्यासात प्रगती नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. पाठांतर करता येत नाही. केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येकजण येऊन अभ्यासाविषयीच बोलतो. वर्गात मुलेही हासतात. मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर निखील याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा - MaharashtraBandh : मुंबईमधील बस, रिक्षासह दुकाने राहणार बंद

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details