महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra farmer Suicide : धक्कादायक! महाराष्ट्रात सत्तेचा सारीपाट खेळला जात असताना 108 शेतकऱ्यांची आत्महत्या - महाराष्ट्र शेतकऱ्यांची आत्महत्या

जून महिन्यात एकीकडे राज्यात सत्ता नाट्य सुरु ( maharashtra political crisis ) होतं. त्यातच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येला कवटाळत होता. एकट्या जून महिन्यात 108 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ( 108 farmers ended their lives june 2022 ) आहेत.

farmer
farmer

By

Published : Jul 10, 2022, 5:15 PM IST

औरंगाबाद -जून महिन्यात एकीकडे राज्यात सत्ता नाट्य सुरु ( maharashtra political crisis ) होतं. भाजप 105 आमदार घेऊन सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखात होती. मात्र, त्याचवेळी मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येला कवटाळत होता. एकट्या जून महिन्यात 108 शेतकऱ्यांनी आत्महत्या ( 108 farmers ended their lives june 2022 ) केल्या, यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

जून महिन्यात 108 शेतकऱ्यांच्या आत्महत्या -कधी नापिकी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी नेहमीच अडचणींचा सामना करतो. या अडचणींकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष जात नाही. ज्या महिन्यात सत्ता संघर्ष राज्यात सुरु होता. शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु होते, तर भाजप सत्ता स्थापनेचे डावपेच आखात होत. महाविकास आघाडी आपली सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. त्याच काळात मराठवाड्यात यावर्षीच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. जून महिन्यात 108 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबाद 14, जालना - 23, परभणी - 9, हिंगोली - 2, नांदेड - 11, लातूर - 5, उस्मानाबाद - 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.



मराठवाड्यात सहा महिन्यांत 466 शेतकऱ्यांची आत्महत्या -यावर्षी मागील सहा महिन्यात 466 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या आहेत. जानेवारी महिन्यात 59, फेब्रुवारी महिन्यात -73, मार्च - 101, एप्रिल - 47, मे - 78, जून - 108 अशा आत्महत्या यावर्षी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यापुढे शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही, असा विश्वास नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही उपाय योजना करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.


मंत्र्यांनी सत्तेसाठी लोकशाहीचा गळा घोटला -स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या युवा नेत्या पूजा अशोक मोरे यांनी शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राजकारण्यांना लक्ष केले आहे. अभिमानाने मिरवणाऱ्या लोकशाहीचा विद्यमान मंत्र्यांनी गुवाहाटीमध्येच गळा दाबला. आम्ही जे काही करतोय ते सर्व जनतेसाठीच करतोय, असा डांगोरा पिटणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सत्तेचा सारीपाट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बळी देऊन मांडलेला आहे. पेरणीच्या घाई गर्दीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रातच पावसाने हुलकावणी दिली त्यातच खते बी बियाण्यांचा प्रचंड काळाबाजार शेतमालाला मिळणारी कवडीमोल किंमत त्यामुळे डोक्यावर असलेले प्रचंड कर्ज या सगळ्या विवंचनेत बीड जिल्ह्यात दररोज एक शेतकरी मरण जवळ करत होता. याच दरम्यान गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून राज्याचे कृषिमंत्री सत्तेचा सारीपाट जवळ करण्यात गुंग होते. आपण राज्याचे कृषिमंत्री आहोत आणि सध्या पेरणीचा हंगाम चालू आहे. ज्या बळीराजाच्या जीवावर आपण मंत्री झालो आहेत. त्या बळीराजाचा आपण काही देणं लागतो याचा पूर्ण विसर पडलेले कृषिमंत्री गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आरामात बसून पंचपकवानावर ताव मारत होते. त्यामुळेच खेदान म्हणावसं वाटतं की या राजकारण्यांनी सत्तेच्या मोहाबाई गुवाहाटीत लोकशाहीचाच गळा घोटला की नाव?, असा प्रश्न पूजा मोरे यांनी उपस्थितीत केला.



ठोस उपाययोजना हव्या -राज्यात हवामानामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संपवणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार कोणतेही असो या आत्महत्या थांबणार नाही. आज शेतकऱ्यांना शेती बाबत शास्वता पाहिजे. पिकांचं नुकसान झाल, पिक कमी आली तर हमी भाव देण्याची गरज आहे. नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. ठोस आणि कायमच्या उपाय योजना झाल्या तरच या आत्महत्या थांबतील याकडे सरकारने लक्ष द्यावे, असं मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details