अमरावती -भोंग्यांच्या विषयावरून सर्वधर्म समभावाच्या विचारांना आमदार रवी राणा यांनी तिलांजली दिली आहे, असे मत व्यक्त करत युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा आहेत. त्यांच्या युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी युवास्वाभिमानचा ( Yuva Swabhiman Party ) राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राणा यांची टोकाची भूमिका अमान्य -जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी लागतो म्हणून खासदार नावणीत राणा यांनी केंद्रात भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्याचे आम्ही समर्थन केले. आता मात्र हनुमान चालीसा पठणासाठी जी टोकाची भूमिका खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी घेतली आहे, ती पक्षाच्या विचाराच्या विरोधातील आहे, असे युवास्वाभिमान अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अब्दुल मकसूद शेख यांनी म्हटले आहे.