अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपूर्ण विदर्भात उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. आज मंगळवारी या संदर्भात राणा यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
युवा स्वाभिमान पक्ष विदर्भात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत, महामेळाव्यात होणार घोषणा - विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय
लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघात निवडून आल्या होत्या. यानंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत विदर्भात पक्षाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे करावेत, असा सूर उमटला.

विधानसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार उभे करण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना आज जाणून घेतल्या. येत्या काही दिवसात युवा स्वाभिमान पक्षाचा महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यातच विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घोषित केला जाईल, असे आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.