अमरावती -अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Shivaji Maharaj Statue Remove In Amravati ) अनधिकृत रित्या पुतळा बसवण्याचे प्रकरण आज दुसऱ्या दिवशीही तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्याचा निषेधार्थ आज युवा स्वाभिमान संघटनेच्या ( yuva Swabhiman Agitation In Amravati ) कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी युवा स्वामी यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांवर ( Yuva Swabhiman Thrown Bangles On Police ) बांगड्या भिरकावल्या.
महापालिकेसमोर प्रचंड तणाव -
आज युवा स्वाभिमान संघटनेचे तीन नगरसेवक राजीनामा देण्यासाठी कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धडकले. यावेळी पोलिसांनी केवळ तीन नगरसेवकांनाच आयुक्तांना भेटण्याची परवानगी दिली. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला बांगड्या अचानक पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या. यानंतर पोलिसांनी मात्र युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. या स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते यावेळी सैरावैरा पळत सुटल्यामुळे राजकमल चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महिला पोलीस जखमी -