अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना वाईट वागणूक देणाऱ्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात सोमवारी युवक काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त पियुष गोयल यांना निवेदन सादर करण्यात आले.
दर्यापूरच्या उपविभागीय अधिकारी विरोधात युवक काँग्रेसची कारवाईची मागणी.. हेही वाचा...दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण
दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसचे दर्यापूर विधानसभा उपाध्यक्ष सागर देशमुख यांच्या नेतृत्वात 8 नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा मोर्चा दर्यापूर तहसील कार्यालयावर धडकला होता. यावेळी तहसीलदार हे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या दालनात बसले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनातच बोलावले होते.
हेही वाचा... काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सविस्तर चर्चेनंतरच सत्तास्थापनेबाबत निर्णय होईल - शरद पवार
युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असता, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी माझ्या दालनात हा काय प्रकार लावला आहे. असे म्हणून शेतकऱ्यांना आपल्या दालनातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याने असा उर्मटपणा करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना अशी वाईट वागणूक देणाऱ्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आज युवक काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली.