महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Crime News : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून देखील लग्नाला नकार; तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - अमरावतीत गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

'लिव्ह इन रिलेशनशिप' राहून देखील लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Young Woman Commits Suicide In Amravati ) आहे.

Frezarpura Police
Frezarpura Police

By

Published : May 4, 2022, 10:00 PM IST

अमरावती -'लिव्ह इन रिलेशनशिप' राहून देखील लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Young Woman Commits Suicide In Amravati ) आहे. लुंबिनी नगर येथे 1 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन फ्रेजरपुरा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ( Frezarpura Police Register Fir Against Six People ) केला आहे.

काय आहे प्रकरण - पोलिसांत नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, लुंबिनी नगर येथील एका तरुणीचे कपिल सोनोने या युवकासोबत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या संबंधाबाबत दोघांच्या घरी माहित झाल्याने कपिलने लग्न करण्यास देखील होकार दिला. त्यानंतर कपिल व ती तरुणी बरेच महिने ‘लिव्ह इन’मध्ये पती-पत्नीसारखे राहिले. परंतु, एप्रिल २०२१ पासून कपिलने तिच्यासोबत राहण्यास टाळाटाळ केली. त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन ते दोघेच राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतून हाकलून दिले. मग आरोपी कपिल हा इंदूरला निघून गेला. ती त्याला भेटण्यास इंदूरला देखील गेली. मात्र, तो तेथे तिला भेटला नाही. उलट त्याने तिला मानसिक त्रासच दिला.

सेवाभावी संस्थकडे दिली तक्रार - १७ जानेवारी २०२२ रोजी तरुणीने कपिल सोनोने विरुद्ध महिला सेवाभावी संस्थांकडे तक्रार दिली. घरच्यांच्या दबावामुळे लग्न करू शकत नसल्याचे त्याने सांगितले. लग्नास नकार दिल्याने तिचे मनोधैर्य खचले. लिव्ह इनमध्ये राहूनही तो लग्नास नकार देत असल्याने तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. १ मे रोजी दुपारी लुंबिनी नगर येथे राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या बहिणीला सहा जणांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या भावाने पोलीस तक्रार दिली.

सहा जणांवर गुन्हा दाखल - याप्रकरणी कपील अशोक सोनोने (२८), अशोक पुंडलिक सोनोने (५९), चंद्रमणी अशोक सोनोने (३०) यांच्यासह महादेवखोरी परिसरात राहणाऱ्या तीन महिला अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती मामनकर या करीत आहेत.

हेही वाचा -Sunil Gavaskar Return Plot : आव्हाडांची नाराजी; सुनिल गावस्करांनी सरकारला भूखंड केला परत, वाचा काय आहे प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details