महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यशोमती ठाकूर यांनी घेतली 'त्या' बालकाची भेट, कठोर कारवाईचे दिले आदेश - amravati black magic news

मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

By

Published : Jun 4, 2021, 9:54 PM IST

अमरावती -मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

यशोमती ठाकूर यांनी घेतली 'त्या' बालकाची भेट, कठोर कारवाईचे दिले आदेश

यशोमती ठाकूर पोहोचल्या बालकाच्या भेटीला
चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. परतवाडा परिसरात आईवडील कामानिमीत्ताने असताना बालकाला धामणगाव येथील खासगी डाॅक्टरांकडे औषधोपचार केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डागण्या दिल्या. त्यामुळे बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी इर्विन रुग्णालयाकडे धाव घेतली व बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व बालकाच्या आई-वडलांशी संवाद साधला.

'अघोरी उपचार रोखा, जाणीव जागृती करा'
याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे, आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात भरीव जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भोंदू बाबांवर कारवाई करतानाच पाड्या-पाड्यावर आरोग्य यंत्रणेद्वारा कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला; आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

ABOUT THE AUTHOR

...view details