महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिखलदऱ्यात साकारला जात आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'

संपूर्ण जगातील पर्यटक हे भविष्यात चिखलदऱ्यात दाखल होणार आहे. त्याच कारण म्हणजे येथे जगातील पहिला सिंगल रोपवे स्कायवॉक तयार होत आहे. या स्कायवॉकमुळे विदर्भाचे काश्मीर असलेले चिखलदरा आता सातासमुद्रापार जाणार आहे.

chikhaldara skywalk
चिखलदऱ्यात साकारला जात आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'

By

Published : Jun 29, 2021, 4:56 PM IST

Updated : Jun 30, 2021, 12:58 PM IST

अमरावती -विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेले अमरावतीमधील चिखलदरा हे पर्यटनस्थळ राज्यभर प्रसिद्ध आहे. निसर्गाचे अदभुत वरदान लाभलेल्या या चिखलदराऱ्याच्या हिरव्यागार सौंदर्य सृष्टीचा मनमोहक आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे येतात. परंतु आता राज्य आणि देशातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील पर्यटक हे भविष्यात चिखलदऱ्यात दाखल होणार आहे. त्याच कारण म्हणजे येथे जगातील आणि देशातील पहिला सिंगल रोपवे स्कायवॉक तयार होत आहे. या स्कायवॉकमुळे विदर्भाचे काश्मीर असलेले चिखलदरा आता सातासमुद्रापार जाणार आहे.

असा आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'

सिंगल रोपवेवर तयार होणारा जगातील पहिला स्कायवॉक-

चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेत समुद्रसापटीपासून हजारो मीटरवर वसलेले पर्यटन स्थळ आहे. येथील नागमोडी रस्ते, थंड हवा, रिमझिम पाऊस आणि शेजारीच असलेलला मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामुळे चिखलदऱ्यात पर्यटकांचा ओढा असतो. अशा या चिखलदराच्या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. कारण येथे एका भल्या मोठ्या काचेचा लांबलचक स्कायवॉक तयार होत आहे. सिडकोच्या माध्यमातून साकारला जाणार हा स्कायवॉक जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आहे. तर भारतातील पहिला मात्र, अशा पद्धतीने 'सिंगल रोपवेवर तयार होणारा जगातील पहिला स्कायवॉक असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने काम संथगतीने -

जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहेत. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. पण चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा 450 मीटरचा असल्याने जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक असल्याचा मान त्याला मिळणार आहे. चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंटपासून तर हरिकेन पॉईंटपर्यंत 450 मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. या स्कायवॉकचे जवळपास 70 टके काम पूर्ण झाले आहे. मात्र, वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने काम सध्या संथगतीने सुरू आहे.

काम पूर्ण करण्याची पर्यटकांची मागणी -

चिखलदऱ्यातील पर्यटनाला या स्कायवॉकमुळे मोठी चालना मिळणार आहे. सोबतच या स्कायवॉकच्या काचांवर चालून दऱ्याखोऱ्यांचा थरारक अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे काम पूर्ण करून तो पर्यटकांना खुला करावा, अशी मागणीही पर्यटकांनी केली आहे. चिखलदरा आणि मेळघाट हे पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे विदर्भच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील लाखो पर्यटक चिखलदाऱ्यात येत असतात. सध्या लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथीलता मिळाली असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी चिखलदाऱ्यात होत आहे. मात्र, जेव्हा या स्कायवॉकचे काम पूर्ण होईल, तेव्हा मात्र देश-विदेशातील लाखो पर्यटक हे चिखलदाऱ्यात हजेरी लावतील, यामध्ये दुमत नाही.

हेही वाचा -COVID Package कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना केंद्राकडून ६.२८ लाख कोटींची योजना

Last Updated : Jun 30, 2021, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details