अमरावती - मराठी कामगारांची पाठराखण करणाऱ्या चार कामगारांचे कर्नाटक येथे स्थानांतरण केल्याने शनिवारपासून रतन इंडियामधील पॉवर मॅक आणि एमबीपीएल कंपनीविरोधात तीनशे कामगारांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र, पाच दिवस होऊन देखील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि खुद्द रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांसोबत कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे अखेर पॉवरमॅक आणि एमबीपीएल विरोधात कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
रतन इंडियातील 'पॉवरमॅक' आणि 'एमबीपीएल'च्या विरोधात कामगारांनी उपसले उपोषणाचे अस्त्र - Workers strike against news amaravati
लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कर्नाटक येथे स्थानांतरण केलेल्या चार कामगारांनी मंगळवारपासून कंपनी परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा...'लॉकडाऊन इफेक्ट' बीडमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतमधील रतन इंडिया वीजनिर्मिती प्रकल्प अंतर्गत पॉवरमॅक आणि एमबीपीएलने मार्च महिन्यांपासून मराठी कामगारांचे वेतन न दिल्यामुळे संतप्त कामगारांनी व्यवस्थापना विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे आकाश गुल्हाने, उमेश लाड, सागर साबळे, रमेश इंगोले या चार कामगारांचे व्यवस्थापनाने आकसापोटी कर्नाटक येथे स्थानांतरण केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. शिवाय शुक्रवारपासून कंपनी परिसरात प्रवेश नाकारल्याने शनिवारपासून तीनशे कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले होते. परंतु लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने अखेर स्थानांतरण झालेल्या चार कामगारांनी मंगळवारपासून कंपनी परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.