अमरावती -अमरावती शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अमरावतीकर त्रस्त असताना महापालिका प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. आता गणपती उत्सवाच्या पर्वावर शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे या मागणीसाठी Amravati Ganeshotsav 2022 आज गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी युवा सेनेच्या वतीने चक्क महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या दलनाचे फाटक केले बंदयुवा सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करीत महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धडकले. यावेळी परिस्थितीचे कामगिरी जाणून आयुक्तांच्या दादा जवळ तैनात असणाऱ्या पोलिसांनी तसेच महापालिकेतील सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दारानासमोरील फाटक बंद केले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बंद असणाऱ्या फाटकासमोर खुर्चीवर गणपतीची स्थापना केली.