अमरावती :सुमारे ३१ वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने अमरावती पोलिसांकडे केल्याने पोलीसही अवाक झालेत. ही महिला पाच वर्षांची असताना तिच्यावर भावाकडूनच बलात्कार करण्यात आला (Woman Sexually abused by brother) होता. हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांनी घराची बदनामी होऊ नये, म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पण आता तीस वर्षानंतर या महिलेने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार (Woman complains against brother) दिली.
पाच वर्षांची असताना अत्याचार -पीडित महिला पती आणि मुलासह दिल्लीजवळच्या नोएडा येथे राहते. पीडिता पाच वर्षांची असताना तिच्या सख्ख्या भावाने बलात्कार केला. लैंगिक शोषणाचा हा प्रकार अनेक वर्षे चालला. १९८३ ते १९९१ या कालावधीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नागरी वसाहतीत घडलेल्या, या घटनेची तक्रार पीडित महिलेने राजपेठ पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री या महिलेच्या भावाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल (Sexual exploitation in Amravati) केला.